Saturday, June 27, 2026
HomeChandrapurराज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चंद्रपूरला होणार
spot_img

राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चंद्रपूरला होणार

राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चंद्रपूरला होणार

Shreyash Wankhede: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ पासून चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन व प्रभा सभागृह वन अकादमी येथे आयोजित होणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.
       यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील राज्यातील १९ केंद्र व गोवा अशी २० केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३८१ नाट्यसंस्थांनी नाटकांचे सादरीकरण केले. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या नाटकांची अंतिम फेरी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
     राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या सर्व संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page