Saturday, June 27, 2026
HomeFestivalsमोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरच्या वतीने शरबत...
spot_img

मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरच्या वतीने शरबत वाटप

मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरच्या वतीने शरबत वाटप

*Jyotsna Wankhede*: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शरबत वाटप स्थळी भेट दिली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, सवित दंढारे, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, रशिद हुसेन वंदना हातगावकर, नगर सेवक जितेश कुळमेथे, आशिष मासिरकर, नगर सेवक नितेश गवळी, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे,जन  प्रलय मशाखेत्री, राजकुमार अक्कापल्लीवार, कार्तिक बोरेवार, निलिमा वनकर, रंजन ठाकुर, प्रविण गिलबिले, ईश्वर विरुटकर.भाग्यश्री येरणे, विनोद अनंतवार, दिनकर सोमलकर, हर्षदा गर्गेलवार, आकाश जुनमलवार, मनिषा पडगेलवार हिमांशु पाल करण नायर इमरान खान, राजिक खान, रिजवान पठाण, समिर शेख, दानिश खान, जफर बेग,  शाहरुख मिर्जा, शैबाज हुसेन, असीम खान,  आदिंची उपस्थिती होती.

हजरत हुसेन (र.अ.) हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहाव्या दिवशी चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही या दिवशी कारागृहातील दार खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे आलेल्या हजारो भाविकांना शरबत वाटप करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page