श्रेयश वानखेडे:
सुर जुळत गेले मार्गदर्शक ही मिळाले आणि त्या मार्गदर्शनाचा पुर्ण लाभ घेण्याची जिद्द, त्यामुळे जनता विद्यालय बल्लारपूर चा विद्यार्थी मा. आशिर्वाद तुकाराम पिपरे दहावी ची परीक्षा न देताच घरून निघून गेला तो थेट मुंबईलाच. त्याच्या क्लास टीचर संघा कानफाडे -साव मैम होत्या. आशिर्वाद पिपरे ने आपले गुरू मा.प्रमोद याज्ञिक यांच्या सोबतीला विविध मोठ्या बॅनर चे चित्रपटांचे प्रत्यक्ष चित्रिकरणाचे अनुभव व पडद्या मागिल विविध कामे करण्याची संधी मिळत गेली. या अनुभवाचा फायदा ते स्वतः लेखक असल्याने “माटी के सौगंध” भोजपुरी फिल्म चे त्यांनी दिग्दर्शन केले. रिलीज नंतर या फिल्म चे सर्वच अधिकार “विनस” कडे सुपुर्द केले.
अलीकडे त्यांचा मराठी चित्रपट “बारा वर्षे सहा महिने” हा मार्च महिन्यात रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.हा चित्रपट बाल कामगार यावर आधारित असल्याचे सांगितले.
त्याची जिद्द व ध्येयनिष्ठा मोठी आहे. त्यांची ही गरुड झेप लक्षात घेऊन दि.5/2/24 ला एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.मा आशिर्वाद पिपरे व सहचारिणी मा.प्रज्ञा पिपरे मुलगा व मुलगी परिवार सहभागी झाला. मा.एम.टी.साव आणि मा.जि.के.उपरे, माजी मानद सचिव सिडीसीसी बँक चंद्रपूर यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा.रोहीणी डुंबेरे उपस्थित होत्या. याप्रसंगी मा.आशिर्वाद म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन एक चित्रपट तयार करण्याचा मानस बोलुन दाखविला. अशी जिद्द आणि चिकाटी मुळे ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी त्यांचे युवकांना मार्गदर्शन मोलाचे आहे.