Wednesday, February 11, 2026
HomeSanghtanaसुरजागड येथील जड वाहतुकीविरोधात उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात सुशी दाबगाव वासियांचे रास्ता रोको...
spot_img

सुरजागड येथील जड वाहतुकीविरोधात उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात सुशी दाबगाव वासियांचे रास्ता रोको आंदोलन

 

सुरजागड येथील जड वाहतुकीविरोधात उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात सुशी दाबगाव वासियांचे रास्ता रोको आंदोलन

 

श्रेयश वानखेडे:
सुरजागड येथील जड वाहतुकीविरोधात उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात सुशी दाबगाव वासियांनी बुधवारी रास्ता रोको अंदोलन केले आहे.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गडचिरोली येथील सुरजागड येथील लोहखनिज उत्पादन करणाऱ्या कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात मूल तालुक्यातील सुशी दाबगाव या गावातून दिवसरात्र आयरणची जड वाहतूक सुरू आहे.त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून गावातील शाळा, अंगणवाडी, रुग्णालय व परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झाले.
दरम्यान बुधवारी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.दरम्यान मूल येथील तहसीलदार, पोलीस प्रशासन, व कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गावातील नागरिकाना पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य शिबीर आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत एकही वाहन जाऊ देणार नसल्याचा पवित्रा राजू झोडे व गावकर्यांनी घेतला.मात्र प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.यापुढे गावातील नागरिकांना प्रदूषणाचा व जड वाहतुकीचा त्रास झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी श्यामभाऊ झिलपे,विनोद शेन्डे,रुपेश कोटारे,मगेश कपाट, कविशवर कपाट,अमोल बोरसरे,मोहन बुरांडे,सिताराम भांडेकर,नंदाजी भांडेकर,बंडू सोमनकर, पंकज तावाडे आदि गावकरी आंदोलक उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page