कुणबी समाजाच्या उप वर-वधू सुची असलेल्या ऋणानुबंध स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

श्रेयश वानखेडे:
अखिल कुणबी समाज मंडळाद्वारे उप वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये संकलित झालेल्या उप वधू-वरांची माहिती एकत्रित करून राहुल भोयर व राहुल मैद यांनी “ऋणानुबंध” जोड नात्याची या नावाची स्मरणिका काढली. या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा ११ फेब्रुवारीला राजस्थान भवन, चांदगाव रोड, ब्रम्हपुरी येथे मोठ्या उत्साहात, थाटामाटात संपन्न झाला.
स्मरणिकेचे प्रकाशन उद्घाटक उषाताई चौधरी तहसीलदार ब्रम्हपुरी व अंकुश मशाखेत्री मॅनेजर कॅनरा बँक ब्रह्मपुरी हे होते तर अध्यक्ष मंडळाचे ऋषिजी राऊत होते. विमोचन प्रसंगी दामोधर मिसार, प्रा. देविदास जगनाडे, ऍड. गोविंदराव भेंडारकर, प्रमोद चिमूरकर, प्रकाश बगमारे, क्रिष्णा सहारे, प्रमोद तोंडरे, ऍड. मनोहर उरकुडे, योगिराज कुथे पाटील, वासुदेव सोंदरकर, प्रकाश धोटे (सावकार), डॉ. सतीश डोनाडकर, डॉ. श्रीकांत नागमोती, डॉ. पंकज लडके, प्रा. राकेश तलमले, प्रा. डॉ. ज्योती दुपारे, नोगेश बगमारे, विनोद झोडगे, बाजीराव भूते, नंदूजी पीलारे कंत्राटदार, प्रेमलाल धोटे कंत्राटदार, नानाजी तूपट, भाष्कर कार, सिद्धेश भरें, सुरेश दर्वे, संदीप ठाकूर, ऍड. हेमंत उरकुडे, हितेंद्र राऊत, प्रशांत भेंडारकर, मनोहर सहारे, लीलाधर झलके, विनोद नवघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सन्माननीय मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राहुल मैंद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशांत पीलारे यांनी केले तर विलास दुपारे यांनी आभार मानले.
” ऋणानुबंध” स्मरणिका प्रकाशन समारंभ या स्मरणीचे संपादक राहुल भोयर (संपादक ब्रह्मपुरी दर्पण), राहुल मैंद (पत्रकार दै. सकाळ), मनोज वझाडे ( मामाजी ), जगदीश ( मोंटू) पिलारे, विलास दुपारे, नारायण मेश्राम, स्वप्निल राऊत, विजय बगमारे यांच्या व युवकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले या कार्यक्रमात समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.