रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ तर्फे बल्लारपूर शहरात हर घर संविधान घर घर संविधान मोहीम ला सुरूवात

श्रेयश वानखेडे:
रूचिका बहुउद्देशीय सामजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर च्या माध्यमातून बल्लारपूर शहरात हर घर संविधान घर घर संविधान मोहीम ला सुरूवात करण्यात आली. ही मोहीम बल्लारपूर शहरात राबविण्या चे काम झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन जयंत कळसकर यांच्या सुचनेनुसार रुचिका बहुउद्देशीय सामजिक संस्था बल्लारपूर च्या अध्यक्षा सौ. सुमनताई कळसकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मंडळ चे लिलाताई कळसकर, वनश्रीताई अलोने, किरणताई वाघमारे, भाग्यलक्ष्मीताई वाघमारे , शुभांगीताई बांबोळे, शिखाताई मुळे, आशाताई मेश्राम, मिनाताई नवघरे ,कल्पनाताई उमरे च्या सर्व महिला माध्यमातून या हर घर संविधान घर घर संविधान या मोहीम ची पहिली सुरूवात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून करण्यात आली आहे.