Saturday, August 15, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*बल्लारपूर बिझनेस असोसिएशनतर्फे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; व्यापाऱ्यांना 'कुल्हड'चे वाटप करून...

*बल्लारपूर बिझनेस असोसिएशनतर्फे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; व्यापाऱ्यांना ‘कुल्हड’चे वाटप करून केला आरोग्याचा संकल्प*

*बल्लारपूर बिझनेस असोसिएशनतर्फे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; व्यापाऱ्यांना ‘कुल्हड’चे वाटप करून केला आरोग्याचा संकल्प*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
बल्लारपूर बिझनेस असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा महात्मा गांधी संकुल परिसरात अत्यंत थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी असोसिएशनने केवळ ध्वजारोहण न करता, प्लास्टिक लॅमिनेटेड पेपर कपच्या वापरावर बहिष्कार टाकून आरोग्यदायी ‘स्वातंत्र्या’चा एक नवा संदेश समाजाला दिला.
दरवर्षी एका नवीन व्यापाऱ्याला ध्वजारोहणाचा सन्मान देण्याच्या असोसिएशनच्या संकल्पनेनुसार, यावर्षी जन-झेड (Gen-Z) युवा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे एम. डी. कलेक्शनचे श्री दीपक घरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहणानंतर असोसिएशनचे अध्यक्ष श्री सादिक जवेरी यांनी उपस्थित व्यापारी बंधू, ग्राहक वर्ग आणि नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगत, एक व्यावसायिक म्हणून देशाप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून दिली व शुभेच्छा दिल्या.
प्लास्टिक लॅमिनेटेड पेपर कपपासून मुक्तीचा संकल्प
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्लास्टिक लॅमिनेटेड पेपर कपच्या विळख्यातून आरोग्याचे स्वातंत्र्य! प्लास्टिक लॅमिनेटेड कपमध्ये गरम चहा, कॉफी किंवा गरम पेय प्यायल्यास आरोग्यावर काय घातक परिणाम होतात गरम पेय सोबत मायक्रो प्लास्टिक पार्टिकल्स शरीरामध्ये पोचतात व जीव घेणे आजाराचे कारण होतात, याविषयी डॉक्टर व तज्ज्ञांचे अहवाल उपाध्यक्ष श्री प्रशांत भोरे यांनी उपस्थितांसमोर मांडली.

स्वतःपासून सुरुवात…

प्लास्टिक कपमुळे होणारे आजार रोखण्यासाठी सर्वांनी अशा कपचा वापर न करण्याचा दृढ संकल्प केला. या उपक्रमाचा भाग म्हणून श्री बल्लू सेठ गिधवानी व अध्यक्ष श्री सादिक जवेरी यांच्या हस्ते ज्येष्ठ आणि युवा व्यापाऱ्यांना ‘मातीचे कुल्हड’ (Clay Cups) भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने बिझनेस असोसिएशनने समाजाला आरोग्याप्रति जागरूक करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला आहे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष श्री प्रदीप भास्करवार, सचिव संजय मुपीडवार, डांगे सर, जगदीश मुंदडा, ज्येष्ठ व्यापारी रामनारायण खंडेलवाल, अमित पाझारे, अरुण वाघमारे, मनोहर चावला, तेजिंदर सिंग दारी, रवींद्र सिंग बवेजा, नरेश मुंदडा, गिरीश गंधेवार, मुरली सेठ मुलांनी, माजिद भाई ,दिनेश सोनिग्रा, लियाकत अली यांच्यासह समस्त व्यापारी वर्गाने परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवी फुलझाडे यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीत केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page