बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली – ना. सुधीर मुनगंटीवार
बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिली मानवंदना
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमते विरोधात लढा दिला. समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशी भावना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील मुख्य चौकात स्थित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका ते मुख्य चौकातील पुतळ्यापर्यंत पदयात्रा करीत बाबासाहेबांना मानवंदना दिली.