Monday, April 20, 2026
HomeChandrapurजिद्द, चिकाटी आणि यशाचा दैदिप्यमान उत्सव!
spot_img

जिद्द, चिकाटी आणि यशाचा दैदिप्यमान उत्सव!

जिद्द, चिकाटी आणि यशाचा दैदिप्यमान उत्सव!

ज्योत्स्ना वानखेडे:
“अम्मा की पढाई” या उपक्रमातून चंद्रपूरच्या स्वप्नांना आज नवी भरारी मिळाली आहे. आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अम्मा की पढाई फाऊंडेशन’चा आज खऱ्या अर्थाने गौरव झाला. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू शकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या उदात्त हेतूने सुरू झालेल्या या उपक्रमातून आज २३ विद्यार्थी विविध शासकीय पदांवर निवडून आले आहेत. ही केवळ आकडेवारी नसून, संघर्षावर मात करून मिळवलेले हे एक दैदिप्यमान यश आहे.
आज या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा आणि त्यांचा उत्साह अनुभवण्याचा योग आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्यासह पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री. आस्तिक कुमार पाण्डेय, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, माजी कुलगुरू श्री. विजय आईंचवार, गडचांदूर नगरपंचायतीचे अध्यक्ष श्री. निलेश ताजने, श्री. रघुवीर अहीर आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
केवळ परीक्षा मार्गदर्शनच नाही, तर ९ महिन्यांचे नियमित वर्ग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, १४ तासांची अभ्यासाची बैठक आणि शारीरिक चाचणीसाठी विशेष प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये १२ अनाथ आणि २१ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असणे, ही या उपक्रमाची सर्वात मोठी सामाजिक उपलब्धी ठरली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस उत्तुंग शुभेच्छा! हा उपक्रम असाच निरंतर सुरू राहो आणि अनेक गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होवो, हीच सदिच्छा.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page