Thursday, January 22, 2026
HomeEducationचंद्रपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ,चंद्रपूर गणित शिक्षकांची सहविचार सभा संपन्न
spot_img

चंद्रपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ,चंद्रपूर गणित शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

चंद्रपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ,चंद्रपूर गणित शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

श्रेयश वानखेडे:
 दिनांक 3 मे 2024 रोजी नियोजित चंद्रपूर जिल्ह्यातील गणित शिक्षकांची सहविचार सभा संपन्न झाली. या सभेस अध्यक्ष म्हणून प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. वैशाली भलमे  प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री सुनील श्रीवास्तव, (अध्यक्ष, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ) तसेच प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून मा. श्री नरेंद्र पिपरे  (अध्यक्ष, नागपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ) व ज्येष्ठ गणित शिक्षक मा. श्री प्रमोद पाटील  हे उपस्थित होते.
या सभेत मार्गदर्शन करताना श्री सुनील श्रीवास्तव (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र गणित अध्यापक महा) यांनी महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे कार्य, विद्यार्थ्यांच्या गणित विकासासाठी आयोजित करण्यात येणारे उपक्रम, विविध गणितीय परीक्षा यासंबंधी मार्गदर्शन केले.  चंद्रपूर जिल्ह्यात गणित अध्यापक मंडळाचे पुनरुज्जीवन करून या मंडळामार्फत गणितीय उपक्रम राबविण्यात यावे  असे आवाहन केले. मा. श्री नरेंद्र पिंपरे (अध्यक्ष, नागपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ)यांनी गणित शिक्षकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यशाळा,  अधिवेशन व उपक्रम याविषयी माहिती सांगून शिक्षकांसाठी गणितीय कार्यशाळा तालुकास्तरावर घेण्यात येत असून गणित शिक्षकांना गणितीय क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी बद्दल अवगत करण्याचे कार्य गणित अध्यापक मंडळ तर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले. गणित अध्यापक मंडळ द्वारे इयत्ता 5 वी करीता असलेली संबोध परीक्षा तसेच इयत्ता आठवी करीता असलेली प्राविण्य परीक्षा या परीक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसविण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यशाळेस चंद्रपूर जिल्ह्यातील गणित शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. धनंजय जिराफे यांनी केले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page