Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeEducationयशाला सलाम, आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून डॉ. स्नेहा वाघमारे हिचा सत्कार

यशाला सलाम, आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून डॉ. स्नेहा वाघमारे हिचा सत्कार

यशाला सलाम, आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून डॉ. स्नेहा वाघमारे हिचा सत्कार

Jyotsna Wankhede:अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनलेल्या स्नेहा वाघमारे हिची प्रेरणादायी यशोगाथा समोर आल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी तिची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच तिच्या जिद्दी, चिकाटी आणि कष्टांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करणार्या वडिलांच्या अल्प उत्पन्नावर शिक्षण घेत स्नेहाने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आर्थिक अडचणी आणि विविध संकटांवर मात करत तिने मिळवलेले यश हे आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा याच्या जोरावर यश मिळवता येते. हे स्नेहाने सिद्ध करून दाखवले आहे. तिची कामगिरी चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार आमदार किशोर जोरगेवार यांनी काढले.

यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्नेहाचा माता महाकालीची मुर्ती, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच भविष्यात समाजसेवेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सायली तोंडरे, नगर सेविका आशा देशमूख, विमल कातकर व स्नेहाचे  आई वडीलही उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page