Monday, January 19, 2026
HomeEducationतत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक...
spot_img

तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केला नवीन चमत्कार

तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केला नवीन चमत्कार

Shreyash Wankhede
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे बोगस मान्यता आणि बोगस आयडीवर पगार काढण्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एक नवीन चमत्कार बाहेर आला आहे.
203 कर्मचाऱ्यांचे विविध प्रकरणातील एरियस बिल भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक या कार्यालयाने दिनांक: 23/04/ 2025 रोजी वापस केले आहे. या तारखेचे वर्ष अद्याप यावयाचे आहे. कारण काय तर ते ऑनलाईन सादरीकरण फेब्रुवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्याच्या नियमित बिलासोबत केले नसल्याचे समजते. याबाबत कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन संबंधीत शाळेच्या लिपिकाला किंवा मुख्याध्यापकांना तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक यांनी केले नसल्याचे चर्चिले जात आहे.
सदर गडबड ही तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कालावधीत झाली आहे. यांना दिनांक: 03/01/ 2024 रोजीचे जावक क्रमांक 310/ 2024 चे निवड श्रेणी एरियस बिल काढायला वेळ भेटला नाही. आणि  स्वंयघोषित नेत्याच्या सौभाग्यवतीच बिल काढण्यामध्ये कसा काय वेळ मिळाला हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
ज्या माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरच्या खुर्चीवर प्रभारी शिक्षणाधिकारी बसल्या आहेत. त्या कार्यालयात  फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे अस्तित्वात  आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी तर एकाच दिवशी 42 जणांचे अप्रुवल आणि आयडी देऊन फार मोठे पुण्याचे कार्य केले आहे.
म्हणूनच  तत्कालीन अधीक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक आणि प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी जे काही चमत्कार रुपी काम केलेले आहे, त्यात काही वावगे नाही. प्रोबेशनल पीरियेड मध्ये अशा चुका होत असतात.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page