भव्यबुद्ध जयंती समारोहाचे आयोजन
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारा बुद्ध विहार समोरील पटांगणावर बुद्ध जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.22मे ला सांय.6.30 वा. ” धम्म प्रबोधनाचे ” आयोजन करण्यात आले आहे. धम्मचारी रत्ननायक, डॉ. ललित बोरकर यवतमाळ, धम्ममित्र भास्कर भगत, यांचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच बुद्ध पौर्णिमेच्या पहाटे 5.30 वा. ” बुद्ध पहाट ” दिव्यांग सांस्कृतिक व पुनर्वसन संस्था अकोला यांच्या कलाकारांच्या वतीने बहारदार संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी तमाम जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करून येण्याचे करावे असे आवाहन समिती द्वारे करण्यात आले आहे.