*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०३/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०४/०० वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी कामावरून घरी परत आले असता, मुलगी घरी दिसून न आल्याने विचारपूस केली असता मुलगी बाहेर खेळण्याकरीता गेली असल्याची माहिती झाल्याने, फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांनी शोधा शोध केली असता आरोपीचे घराजवळ लहान मुलीचा आवाज आल्यासारखे वाटल्याने आरोपीचे घरी जावून पाहिले असता आरोपी हा अल्पवयीन मुलीला घरातील पलंगावर झोपवून अत्याचार (लैंगिक कृत्य) करताना दिसून आल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून तसेच मेडीकल रिपोर्ट वरून पोलीस ठाणे रामनगर येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क्र. ६११/२०२२ कलम ३७६(एबी),५०६ भादवी सह ४,६ पोक्सो कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.
*मा. न्यायालयाचा निकाल*
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोकता श्री. एस. आर. डेगावार यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक ०५/०९/२०२६ रोजी आरोपीस कलम ३७६(एबी) भादवी सह ४,६ पोक्सो कायद्यान्वये १० वर्ष सश्रम कारावास व ५,००० रू दंड दंड न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.
*तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी*
– तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजुरकर पोलीस स्टेशन रामनगर
– सरकारी अभियोकता श्री. एस. आर. डेगावार
– कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनी शामराव पोईनकरे, पोस्टे रामनगर
– दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर
सदर कामगिरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.