Sunday, January 18, 2026
HomePoliticalसरपंच, उपसरपंचावरचा अविश्वास प्रस्ताव बरगडला
spot_img

सरपंच, उपसरपंचावरचा अविश्वास प्रस्ताव बरगडला

सरपंच, उपसरपंचावरचा अविश्वास प्रस्ताव बरगडला 

काँग्रेस बीजेपी समर्थित नेत्यांमुळे  दोन्ही पदे तारले 

श्रेयश वानखेडे:
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मधील १४ सदस्यांनी सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचेवर ७ जुन रोजी बल्लारपूर तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुषंगाने बल्लारपूर तहसीलदारानी १२ जूनला दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत  कार्यालय, विसापूर येथे विशेष सभा आयोजित केली होती. त्या सभेत काँग्रेस व भाजप समर्थित नेत्यांनी काही सदस्यांची मते वळविण्यात यशस्वी ठरल्याने त्या सदस्यांनी ऐनवेळी पलटी मारल्याने अविश्वास ठराव बरगडला व त्यामुळे दोन्ही पदे तारल्या गेली.
    बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत मध्ये  एकूण १७ सदस्य आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ आहे. यातील १४ सदस्यांनी विसापूर ग्रामपंचातीच्या सरपंच व उपसरपंच  यांच्यावर विविध कारणे दर्शवून ७ जुन रोजी तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांच्या समक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या १४ सदस्यांच्या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी केली होती.त्यानुसार तहसीलदारांनी अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात १२ जुन रोजी विशेष सभा बोलावली होती. त्या सभेत सरपंच वर्षा कुळमेथे यांना पदावरून पायउतार करण्यासाठी ¾  म्हणजे १३ मताची गरज होती परंतु  १० विरुद्ध ७ मते पडल्याने त्या वाचल्या व त्यांचे पद कायम राहिले तर उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी ⅔ म्हणजे १२ मते पायउतार करण्यासाठी आवश्यक होते. परंतु त्यांना ६ विरुद्ध ११ मते मिळाल्याने त्यांचेही पद कायम राहिले हे सर्व मत प्रक्रिया आवाजी व हात वर करून घेण्यात आली. सदर अविश्वास प्रस्ताव प्रक्रियेसाठी अभ्यासी अधिकारी म्हणून बल्लारपूर तहसीलदार सतीश साळवे व त्यांना सहकार्य करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी किशोर धकाते, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे  आणि तलाठी अजय नौकरकर उपस्थित होते.
 अविश्वास दर्शक ठरावाबाबत गावकरी अनुउत्साही 
गावात मागील १५ दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने गावकऱ्यांनी या अविश्वास ठराव बाबत कोणताच उत्साह दाखविला नाही. उलट ही मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी ग्रामपंचायतिने नौटंकी केलाचा सुरू काही नागरिकांनी बोलून दाखविला.
 उपसरपंचानी स्वतःवरच दाखवला अविश्वास 
अविश्वास दर्शक ठरावा दरम्यान आवाजी व हातवर करून करण्यात आलेल्या मतप्रक्रियेत जेंव्हा उपसरपंचा वरील ठरावावर मत घेण्यात आली तेंव्हा उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी स्वतःवरच अविश्वास दाखवत हातवर करून मत प्रकट केले परंतु त्यांना कायम ठेवण्यासाठी ११ सदस्यांनी समर्थन दिल्याने त्यांचे पद कायम राहिले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page