श्रेयश वानखेडे:
शहरातील पेपरमिल तीन एक्का गेट परिसरातील असलेल्या वाईन शॉपवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने, २० मे रोजी छापा टाकून सील केले आहे.
येथील पेपरमिल परिसरातील मिलिंद वाईन शॉप ला, २० मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ दिवसाकरिता सील ठोकले आहे.
तीन महिन्या अगोदर गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीत बनावट दारू ची खेप पोलीसांनी पकडले होते. त्याचे धागेदोरे या वाईन शॉप सोबत जोडले गेले होते. त्यातच या वाईन शॉप मध्ये नकली दारू असल्याचा संशयावरून दारूबंदी विभागाणे काही दारूचा पेट्या तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविल्या होत्या. त्याचा अहवाल आल्यावर दारूबंदी विभागाने कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मिलिंद वाईन शॉप चे परवाना १५ दिवसाकरीता निलंबित करून सील ठोकले आहे. तसेच वाईन शॉप मध्ये अनियमित साठा, जागेची कमतरता व दारू साठा दुसरी कडून नेऊन ठेवणे आदी बाबीवर ठपका ठेवून सील ठोकले.
सदर वाईन शॉप नागपूरच्या मिलिंद ट्रेडिंग कंपनीद्वारे चालवली जाते. या वाईन शॉपचे चार सहभागी असून नागपूरचे दोन, चंद्रपूर चे एक व एक बल्लारपूर चे भागीदार आहेत.