अनोळखी मृत इसमा बाबत संपर्क साधावा
श्रेयश वानखेडे:
दिनांक 23/ 06 /2024 रोजी सदर मृतक अनोळखी इसम वय 40 वर्ष हा 10 वाजता सुमारास अपघात विभाग सामान्य रुग्णालय चंद्रपूर समोर प्रकृती खराब झाल्याने झोपलेल्या स्थितीत ओपीडी ऑपरेटर संजय गोमासे यांना दिसून आल्याने त्यास उपचारास भरती केले असता तो उपचारादरम्यान दिनांक 26/ 06 /2024 चे 8/50 वाजता मरण पावला असे डॉक्टर कनक बनकर यांनी घोषित केले.
सदर अनोळखी इसम मरण पावल्याने डॉक्टरी मेमो वरून तसेच एएसआय दिलीप आत्राम यांचे लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक 30/06/2024 रोजी मार्ग क्रमांक 83/24 कलम 174 सीआरपीसी अन्वये नोंद करून पुढील चौकशी पीएसआय विजय मुके हे करीत आहे.
मृतक अनोळखी ईसमाचे वर्णन- अनोळखी इसम पुरुष व अंदाजे 40 वर्ष, बांधा सडपातळ, रंग काळा सावळा, गाल खोलगट, डोक्याचे केस काळे, दाढी मिशी वाढलेली, अंगात दवाखान्याचे हिरवा हाफ शर्ट व निळा पॅन्ट घातलेला, सदर इसमाचा नातेवाईक यांचा शोध होनेस आपले परिसरात शोध घेऊन नातेवाईक मिळून आल्यास तसेच कोणास सदर अनोळखी मृतक इसमाचा माहिती मिळुन आल्यास पो. नि . प्रभावती एकुरके मो. न.9767103829 तसेच PSI विजय मुके मो. न. 9923401065 यांचेशी संपर्क करा.