Tuesday, January 20, 2026
HomeUpkramनालंदा पब्लिक स्कूल मध्ये भव्य आरोग्य शिबीर
spot_img

नालंदा पब्लिक स्कूल मध्ये भव्य आरोग्य शिबीर

नालंदा पब्लिक स्कूल मध्ये भव्य आरोग्य शिबीर

Shreyash Wankhede:
बल्लारपूर येथील नालंदा पब्लिक स्कूल येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते आदी ची उपस्थित होते. शिबिरात तज्ञ डॉक्टर द्वारे मोफत सल्ला देण्यात आले तसेच मोफत आरोग्य किट वाटप करण्यात आले. बालरोगतज्ञांकडून विशेष तपासणी, दंतवैद्यांद्वारे दातांच्या समस्या तपासल्या गेले तसेच आरोग्य जनजागृती, प्राथमिक आरोग्य तपासणी आणि रोग प्रतिबंधक उपायांचे मार्गदर्शन, पोषण आणि आहार सल्ला, तणाव आणि मानसिक आरोग्य समुपदेशन, योग आणि ध्यान सत्र आदींचे मार्गदर्शन केले गेले.
        शिबिरात डॉ. अभिलाषा गावतुरे बालरोगतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या भूमिपुत्र ब्रिगेड,  डॉ सोनाली कपूर बालरोगतज्ज्ञ, डॉ प्रमेय भगत, डॉ पूजा वंजारी, डॉ दीक्षा फुलझेले दंतचिकित्सक , परिचारिका स्मिता वासनिक, अश्विनी आत्राम, स्वयंसेवक राहुल गुरनुले यांचा चमूने तपासणी केले.
      या वेळी नालंदा पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शमीम शब्बीर, शिक्षकगण आणि कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात शाळेचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी आरोग्य तपासणी करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला.  हे शिबिर आरोग्य सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page