बामणी प्रोटीन्सचा तिढा सुटला प्लायवूड फॅक्टरीच काय ?
मागील दीड दशकांपासून बंद असल्याने त्या कुटुंबाची झाली वाताहत
पालकमंत्र्यांनी यावरही यशस्वी तोडगा काढावा ; अशी कामगारांची मागणी

गाव झाला भंकसपूर्वी चुनाभट्टी व बल्लारशाह प्लायवूड कंपनी, औष्णिक विद्युत केंद्र (पावर हाऊस) सुरू असल्याने विसापूर व आजूबाजूतील परिसरातील बाजाराला चालना मिळत होती. यामुळे कापड, किराणा व इतर मूलभूत गरजा असलेले वस्तू कामगार गावातून खरेदी करत होते. परंतु उद्योग बंद झाल्याने इतर सर्व व्यवसायाला उतरती कळा लागली अनेक कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे अख्खे कुटुंबाच्या कुटुंब रोजगारांसाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे गाव शेजारी सुविधा युक्त क्रीडा संकुल, सैनिक शाळा, जगप्रसिद्ध बॉटनिकल गार्डन, नामांकित एस एन डी टी महिला विद्यापीठ असूनही गाव भंकस झाला आहे.
|
|
|
प्लायवूड फॅक्टरी बंद पडल्या पासून मिळेल ते काम करून संसाराचा गाडा कसा तरी हाकलावा लागत आहे. अनेक कामगारांनी नैराश्यातून व आर्थिक तंगीतून आत्महत्या करून आपले जीवन संपवलेले आहे.
नागोराव ढवस , माजी कामगार बल्लारशाह प्लायवूड कंपनी
|






