Friday, June 26, 2026
HomeEducationमाध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे चालू आहे बुलाई खेळ
spot_img

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे चालू आहे बुलाई खेळ

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे चालू आहे बुलाई खेळ

कु. निखिता ठाकरे प्रभारी शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे असलेला शिक्षण अधिकारी पदाचा प्रभार काढून त्यांचे विरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी- नागो गाणार

श्रीमती कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. चंद्रपूर यांची बदली झाल्यामुळे शिक्षण अधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी, कु. निखिता ठाकरे यांना नियमबाह्यरित्या सोपवण्यात आला. त्यांचेपेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी कार्यरत असताना त्यांना डावलून कु. निखिता ठाकरे यांना शिक्षण अधिकारी पदाचा पदभार देणे योग्य आणि नियमबाह्य आहे.
 कुमारी निखिता ठाकरे प्रभारी शिक्षण अधिकारी यांचे विरुद्ध अनेक तक्रारी आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या दिनांक: 24/06/ 2024 च्या पत्राचे अनुपालन न करणे, प्रभूरामचंद्र विद्यालय नांदा  तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर येथील भ्रष्टाचार करणाऱ्याला संरक्षण देणे,  वरिष्ठ/ निवड वेतनश्रेणीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवणे, शिवाजी विद्यालय कोंढा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिरंगाई करणे, लोकमान्य विद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील ९ अवैध कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक/ शिक्षक कर्मचार्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवणे इत्यादी अनियमित व  गैरप्रकार राजरोजपणे करण्यात येत आहे.
त्यामुळे कु. निखिता ठाकरे ह्या शिक्षण अधिकारी पदाचा पदभार सांभाळण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट  होते. उच्च न्यायालयाने सुद्धा दिनांक 4 जुलै 2024 च्या आदेशात त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला पदभार तात्काळ काढून घेणे व त्यांचे विरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे.
 करिता कु. निखिता ठाकरे प्रभारी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे असलेल्या शिक्षण अधिकारी पदाचा प्रभार तात्काळ काढून त्यांच्याविरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार मान. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर व मान. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना जावक क्रमांक: एन.जी./ माजी/ वि.प.स./ ७७९/२४ दिनांक: २२/०७/२०२४ रोजी नागो गाणार माजी शिक्षक आमदार यांनी दिली आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे बुलाई  खेळ चालू असल्याची चर्चा जोरात सोरात सुरू आहे.


Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page