Saturday, August 8, 2026
spot_img
Homeबल्लारपूरविसापूरच्या सैनिक स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

विसापूरच्या सैनिक स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

विसापूरच्या सैनिक स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
सैनिक स्कूल विसापुर येथे शुक्रवार २६ जुलै २०२४ रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाच्या २५ व्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ शाळेतील अमर जवान ज्योती स्मारकाला प्रमुख पाहुणे शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त नायब सुभेदार मेंगरे शंकर गणपती यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य तथा कॅप्टन भारतीय नौसेना अश्विन अनुपदेव व प्रशासकीय अधिकारी  लेफ्ट. कमांडर रजत उपस्थित होते.
     कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सैनिक स्कूल येथे कॅडेट्सना कारगिल विजय दिवसाचे महत्त्व आणि आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल माहिती व प्रेरणा मिळावी म्हणून विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पाहुणे शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त नायब सुभेदार मेंगरे शंकर गणपती यांनी कॅडेट्सना संबोधित केले आणि त्यांना शौर्य आणि देशभक्तीच्या कहाण्यांनी प्रेरित केले. हा कार्यक्रम देशाच्या सशस्त्र दलांबद्दलच्या कृतज्ञतेसाठी व  त्यांनी मिळवून दिलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण म्हणू साजरा करण्यात आला त्यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, प्रशासनिक कर्मचारी तथा कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शहीद जवानाच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page