श्रेयश वानखेडे:
वार्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमातून मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार जी(वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा) यांच्या वाढदिवसानिमित्त वार्डातील 200 मुला – मुलींना चित्रकला पुस्तकाचे वितरण करण्यात आले. दर वर्षी भाऊ च्या वाढदिवसानिमित्त वार्डात शालेय उपक्रम राबविला जातो.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. किशोर मोहुर्ले(सामाजिक कार्यकर्ता) व सौ.जयश्री मोहुर्ले (माजी शिक्षण सभापती, बल्लारपूर) यांनी केले. या प्रसंगी उपस्थित अनेकांनी सुधीरभाऊ यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.