Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

*ज्योत्स्ना वानखेडे*: 

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक: 28/07/2026 ला दुपारी 3:00 वाजता पालक शिक्षक सभेचे आयोजण करण्यात आले. या सभेचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय आसमा खान खलीदी मॅडम असून पर्यवेक्षिका सुनिता कांबळे मॅडम तसेच पालक वर्गातील आरिफा शेख रुमाना तस्किन व विद्या बोरकर हे मंचावर उपस्थित होत्या.
मंचावर उपस्थितांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलीत करण्यात आले. मंचावरील सर्व मान्यवारांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सखी सावित्री समिती बद्दल जोशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले व शबाना मॅडम यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती बद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संजय ठोंबरे सर यांनी  व्यावसायिक मार्गदर्शन केले.
त्यानंतर पर्यवेक्षिका सुनीता कांबळे मॅडम यांनी शाळेतील नियम व शिस्त बद्दल याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अध्यक्षीय भाषण शाळेच्या मुख्याध्यापिका  माननीय आसमा खान खलिदी मॅडम यांनी दिले. संचालन वैशाली गेडाम मॅडम यांनी केले तर आभार नजमी सिद्दिकी मॅडम यांनी मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page