Monday, January 19, 2026
HomeMaharashtraजेष्ठ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व हरामखोरांना अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी सामुहिक...
spot_img

जेष्ठ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व हरामखोरांना अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी सामुहिक आत्मदहन – विनोद पत्रे

जेष्ठ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व हरामखोरांना अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी सामुहिक आत्मदहन – विनोद पत्रे

राज्यातील ग्रामीण व शहरी जेष्ठ पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या विरोधात पत्रकार संरक्षण समिती चे सामुहिक आत्मदहन…

 

Shreyash Wankhede:

एकीकडे माहिती व जनसंपर्क विभागाचा भोंगळ कारभार चालला असून काहि अधिकारी, समिती सदस्य चोरांच्या टोळीचे  भागीदारी असून चक्क एका अधिकार्यांने अनेक पत्रकारांना खोटे व बनावट कागदपत्रे देऊन पेन्शन लागू केलेली आहे. अशा विविध मागणी करीता पत्रकार संरक्षण समिती चे सामुहिक आत्मदहनाचा ईशारा दिला असून राज्यातील जेष्ठ ९० पत्रकारांचे पेन्शन रोखले असून खर्या व प्रामाणिक पत्रकारांना पेन्शन दिले जात नाही ही फार मोठी खंत…
राज्यातील जेष्ठ ९० पत्रकारापैकी गोष्ट एका जेष्ठ पत्रकाराच्या संघर्षाच्या लढाईची, सातारा जिल्हयातील विलास शहा या जेष्ठ पत्रकाराने आपला पेन्शन अर्ज वारंवार जिल्हा माहिती अधिकारी सातारा येथे दाखल केला परंतु जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी नितिन कोकरे व मुद्रक माहिती कार्यालय राहुल पवार यांनी जेष्ठ पत्रकार विलास शहा याचा पेन्शन अर्ज फाडून फेकून दिला, या़चे अनेक पुरावे सापडणार ,  परंतु जेष्ठ पत्रकार विलासजी शहा येवडयातच थांबले नाही ते आज आपली लढाई लढतच आहे आणि त्यांनी स्वताह देशाचे पंतप्रधान मा. नरेन्द्र मोदी यांना आपली सर्व माहिती पाठविली व याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवांनी लेखी पत्र संबंधित विभागाला पाठविले परंतु या विभागाने मोदी यांच्या पत्राची कुठलीही दखल न घेता केळाच्या टोपलीत फेकून देण्यात आले. असे अनेक ८९ जेष्ठ पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित आहे. म्हणून या पुढे जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर या सर्व ९० जेष्ठ पत्रकारांना घेऊन राष्ट्रपति भवन दिल्ली येथे आमरण उपोषण लवकरच करणार तसे लेखी पत्र राज्यातील जेष्ठ पत्रकार लवकरच ठरावासह देणार आहे.
आपली – पत्रकार संरक्षण समिती

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page