*अवैध देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व 4 राऊंड जप्त, स्थानिक गुन्हे शाखा ची कारवाई*
ज्योत्स्ना वानखेडे:
दि.04.06.2026 रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अवैधरित्या विनापरवाना एक गावठी अग्निशस्त्र व 4 राऊंड आपल्या सोबत बाळगून असलेल्या इसमावर छापा टाकून सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध पो.स्टे. बल्लारशा येथे अप. क्र. 651/26 कलम 3, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस पो. स्टे. बल्लारपूर चे ताब्यात देण्यात आले.

आरोपी :
सलमान खान मजिद खान पठाण , वय 28 वर्षे,
रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड बल्लारशा, ता. बल्लारशा, जि. चंद्रपूर.

जप्त मुद्देमाल :
• एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व 4 राऊंड, एकूण 39,000/- रुपये.
•

कारवाई करणारे पथक :
उपविभाग राजुरा पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.