Sunday, September 13, 2026
spot_img
HomeEducationसरदार पटेल महाविद्यालयात मुख्याध्यापकांची सभा संपन्न

सरदार पटेल महाविद्यालयात मुख्याध्यापकांची सभा संपन्न

सरदार पटेल महाविद्यालयात मुख्याध्यापकांची सभा संपन्न

श्रेयश वानखेडे:
       माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या तर्फे दिनांक: 13-08- 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा सरदार पटेल महाविद्यालय  चंद्रपूर येथे पार पडली.
       नेताजी चौकातील चंद्रपूर महानगरपालिकेची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या विद्यार्थी संख्या वाढीसाठी कसे प्रयत्न करावे लागतात याबाबत  आपले विचार विशद केले.
       इन्स्पायर अवार्ड बद्दल बोलताना श्री. धनंजय जीराफे सर यांनी इन्स्पायर अवॉर्ड योजना काय आहे. किती टक्केवारीच्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवार्ड मिळतो.  इन्स्पायर अवार्ड योजना मध्ये किती रक्कम दिली जाते. इन्स्पायर अवार्ड साठी सर्वात चांगले विचार कोणते आहे. इन्स्पायर अवार्ड पासून फायदा कोणता आहे. याबाबत माहिती दिली.
          सभेला डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व त्याविषयीचे अध्ययन अध्यापन यावर  विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
        श्री. राजेंद्र परतेकी सर यांनी शाळा सक्षमीकरण बाबत माहिती देताना सांगितले की, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भाग असलेला जिवती तालुक्यात त्यांनी कशा प्रकारे शाळेला डेव्हलप करण्यासाठी योगदान दिले आहे. शिक्षकाने त्यांना शासनाने नेमून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त जर थोडेसे जास्त योगदान दिले. तर यासारख्या शाळा शहरी आणि ग्रामीण  भागामध्ये विकसित होऊन देशाला उन्नतीकडे नेऊ शकतात. विद्यार्थी हा राष्ट्राचा कणा आहे. त्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले मुख्य ध्येय असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
         कु. निखिता ठाकरे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, माझी पहिली नियुक्ती याच ठिकाणची आहे आणि या ठिकाणी चार्ज घेतल्याच्या नंतर माझ्यासमोर जी आव्हाने उभी होती, ती आपल्या सहकार्याने कमी कमी होत असताना दिसत आहे. मनुष्य हा अनुभवातून शिक्षण घेत असतो.
       सभेचे अध्यक्ष स्थान कु. निखिता ठाकरे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी भुषवले. तसेच प्रास्ताविक व आभार त्यांनीच मानले. संचालन श्री. सावन चालखुरे विस्तार अधिकारी यांनी केले.

     सभेला चंद्रपूर जिल्ह्यातील 450 शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page