Tuesday, January 20, 2026
HomePolitical*शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत करावी*
spot_img

*शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत करावी*

*शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत करावी*

Shreyash Wankhede:

जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या नुकसानीची तक्रार येत्या 72 तासाच्या आत करावी, असे आवाहन भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत विमा भरलेला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा दिला जातो. या संदर्भात, नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करणे आवश्यक आहे. यामध्ये जास्तीचा पाऊस, अतिवृष्टी, पिक वाहून जाणे आणि शेतात पाणी साचणे यांचा समावेश आहे.

तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 14447 किंवा क्रॉप इन्सुरन्स अॅपचा वापर करावा. तसेच, ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी. तक्रार केल्यानंतर देण्यात आलेला डॉक्युमेंट आयडी क्रमांक साठवून ठेवावा, ज्यामुळे भविष्यात नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मदत होईल.

असे आवाहन भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांनी केले आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page