रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब बल्लारपूर तर्फे शिक्षक दिवस साजरा
श्रेयश वानखेडे:
दिनांक: 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता, रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर आयोजित… “शिक्षक दिवस” _बल्लारपूर_ येथील नगर परिषद शाळा व शहरातील विविध शाळांमध्ये उत्सव साजरा करण्यात आला.
विविध शाळांमधून एकूण 136 शिक्षक उपस्थित होते आणि रोटरी टीम आणि रोटरॅक्ट टीमने त्यांची शिक्षक दिन हा उत्सव साजरा केला आहे. व त्यांना पेन देण्यात आली आहे. बल्लारपूर तहसील कार्यालयातिल येथील शिक्षण विभागातही सत्कार केला.
शिक्षक दिवस या उत्सव मध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. प्रशांत दोंतुलवार, रोटरी क्लबचे, सचिव रोटे. उत्तम पटेल, आयपीपी रोटे. प्रफुल्ल चरपे, रोटे. कल्पेश पटेल, रोटे. हेमराज गेडाम आणि इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.
रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष आरटीआर गौरव पटेल, सचिव आरटीआर रजत परमार, अमोल गांधी, अरविंद डांबरे, देव मेश्राम, मोहित पटेल, अभिषेक गजबे आणि मारिया सोनटक्के यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
शिक्षकांच्या स्माईलने आमचा दिवस बनवला कारण त्यांच्या मेहनतीचा दिवस संस्मरणीय बनवला. त्यांच्यासाठी हे सन्माननीय प्रयत्न करू अशी अपेक्षा त्यांना कधीच केली नव्हती.