जनता विद्यालय सिटी ब्रांच बल्लारपूर येथे माहिती अधिकार दिन साजरा



जनता विद्यालय सिटी ब्रांच बल्लारपूर येथे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक श्री. राजू वानखेडे, सहाय्यक शिक्षक, जनता विद्यालय डेपो शाखा बल्लारपूर तथा माहिती अधिकार तज्ञ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बी. के. लांडे, पर्यवेक्षक श्री. आर. आर. निखाडे, डॉ. पंकज मत्ते पाळीप्रमुख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक श्री. राजू वानखेडे यांनी माहिती अधिकार दिनाचे महत्त्व व माहिती अधिकार कायद्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. के. लांडे मुख्याध्यापक यांनी शासकीय माहिती अधिकारी आणि आर. टी. ई. बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. राजू निखाडे पाळीप्रमुख यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन पी. एम. उरकुंडे सर यांनी केले.






