Sunday, May 31, 2026
HomeNagpurहजार रुपयांच्या लाचेसाठी अडकला आरटीओ अधिकारी!
spot_img

हजार रुपयांच्या लाचेसाठी अडकला आरटीओ अधिकारी!

हजार रुपयांच्या लाचेसाठी अडकला आरटीओ अधिकारी!

ज्योत्स्ना वानखेडे:

सिमा तपासणी नाका (चेकपाेस्ट) कांद्री येथून वाहन पास करण्याकरिता एका वाहनचालकाकडून एक हजार रुपयांचा लाच दलालार्माेत घेणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर शहर येथील माेटार वाहन निरीक्षकाला नागपूर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

लाचेची रक्कम घेणाऱ्या दलालाही अटक करण्यात आली. ही कारवाई बुधावारी करण्यात आली. अभिजित मधुकर टाले असे लाचखाेर आरटीओचे तर सुशील विनाेद रामटेककर असे दलालाचे नाव आहे.

तक्रारदार हे व्यवसायाने वाहन चालक असून मालकाचे ट्रेलर चालवितात. तक्रारदार चालवित असलेले ट्रेलर कान्द्री येथील आरटीओ चेकपाेस्ट (सिमा तपासणी नाका) येथून वाहन पास करण्याकरिता तेथील अधिकारी त्यांचे अखत्यारित खाजगी एजंट हे एक हजार ते दीड हजार रुपये प्रतिवाहन घेत हाेते. गेल्या अनेक महिन्यांपासून लाच देत हाेते. त्यांनी या गैरप्रकाराबाबत एसीबीमध्ये तक्रार केली. तक्रारीवरून 11 मार्च राेजी एसीबीच्या अधिकाèयांनी कांद्री येथे सापळा रचला. तक्रारदार हे त्यांचे मालकाचे ट्रेलर घेऊन नागपूर ते देवलापार येथे जातांना कांद्री येथील आरटीओ सिमा तपासणी नाका येथून ट्रेलर पास करण्याकरीता माेटार वाहन निरीक्षक अभिजित टाले यांच्यासाठी काम करणारा दलाल सुशील रामटेककर याने तक्रारदार चालवित असलेले ट्रेलर चेकपाेस्ट मधून पास करण्याकरिता एक हजार रुपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष स्विकारली. चेकपाेस्ट येथील कार्यालयाची झडती घेतली असता तेथे 4 लाख 31,290 रुपये नगदी मिळून आले.rto officer bribe सदर दाेन्ही आराेपीतांना कांन्द्री चेकपाेस्ट येथून ताब्यात घेण्यात आले असून पाेलिस स्टेशन रामटेक, नागपूर ग्रामिण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारणा 2018) अन्वये गुन्हा नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई एसीबीचे पाेलिस अधीक्षक डाॅ. दिगंबर प्रधान, अति. अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पाेलिस निरीक्षक राजकिरण येवले, आणि सापळा पथक पाेलिस निरीक्षक जितेंन्द्र वैरागडे, भरत ठाकुर,दिपाली भगत, हाेमेश्वर वाईलकर यांनी केलेली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page