पर्यावरण वाहिनी कडून वृक्षारोपण
श्रेयश वानखेडे:
कारवा रोडच्या जंगलात पर्यावरण वाहिनी कडून जंगलात वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण पर्यावरण वाहिनीचे सदस्य श्री सतीश गोगलवार आणि श्री राजू मारपल्लीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
“वन संरक्षण, वन संवर्धन” या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी पर्यावरण वाहिनी व्दारे दर वर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलात आणि शहरात वृक्ष लागवड आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासंबंधी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी चिंच, कविट, आंबा, पीपळ, बांबू, रिठा, तुती, मोहा, उंबर निम आदींची सुमारे शंभर रोपे लावण्यात आली. परिवर्तन वाहिनीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहम्मद शरीफ गुरुजी, उपाध्यक्ष श्री. विनायक राव साळवे, सचिव प्रकाश नरसिंगोज, विवेक खुटेमाटे, सतीश गोगुलवार, राजू मारपल्लीवार, केशव थिपे, सुधीर कोरडे, समीर शेख, निकेत कोरडे, प्रवीण कुंभारे, अमोल काकडे, हेमराज गेडाम आदी उपस्थित होते.