*वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय, भद्रावती येथील वनपाल व वनरक्षक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरची कारवाई*
*ज्योत्स्ना वानखेडे*
*प्रकरण काय आहे?*
1. *कोणाला अटक झाली:*
– *आरोपी 1:* श्री. कोमल नरसिंगराव घुगलोत, वय 42 वर्ष, पद – वनपाल, वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय भद्रावती
– *आरोपी 2:* श्री. संदीप पुंडलिक पारवे, वय 39 वर्ष, पद – वनरक्षक, वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय भद्रावती
– *आरोपी 3:* श्री. ललीत दिलीप नागपूरे, रा. भद्रावती – खाजगी इसम/एजंट
2. *गुन्हा:*
तक्रारदार ट्रॅक्टर-ट्रॉलीने अवैधरित्या रेती वाहतूक करत होते. त्यांची केलेली कारवाईचे कागदपत्र वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी या दोन्ही वन अधिकाऱ्यांनी *20,000/- रुपये लाचेची मागणी* केली.
लाचेचे पैसे खाजगी इसम श्री. ललीत नागपूरे यांच्यामार्फत स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने *दि. 27/07/2026 रोजी तिन्ही आरोपींना रंगेहात पकडले.*
3. *तक्रार कधी दिली:*
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी दि. *23/07/2026 रोजी* लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दिली होती.
4. *पुढील कारवाई:* तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
*ही कारवाई कोणी केली?*
डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक आणि श्रीमती माधुरी बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल जिठ्ठावार, पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
*नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन:*
जर कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या एजंटने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायद्याने ठरलेल्या फी व्यतिरिक्त लाच मागितली तर *तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा.*
*संपर्क – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर*
– *श्री. अनिल जिठ्ठावार, पो.उप.अधीक्षक:* 9823270581
– *श्री. प्रशांत केदार, पोलीस निरीक्षक:* 8788723765
– *Toll Free No:* 1064
– *Phone No:* 07172-250251