राजुरा विस उमेदवार भाजपा चे देवराव भोंगले च्या चारही अर्जात त्रुटी
अर्ज पात्र नसल्याने त्वरित खारिज करावा
पत्रपरिषदेत सूरज ठाकरे आणि उमेदवार भूषण फुसे यांची मागणी
श्रेयश वानखेडे:
राजुरा विधानसभा मतदार संघाअंतर्गत भाजपच्या वतीने उमेदवारी दाखल केलेले भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या चारही अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात राजुरा विधानसभा उमेदवार भूषण फूसे आणि सूरज ठाकरे यांनी भोंगळे यांनी अर्जांमध्ये काही महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याने हे चारही अर्ज तातडीने फेटाळण्याची मागणी पत्रकार परीषदेत केली आहे.
भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने दिलेल्या माहितीचा तपशील मांडला. चारही उमेदवारी अर्जात टाकलेली माहिती चुकीची आणि आक्षेपार्ह आहे. त्यामुळे ठाकरे आणि फुसे यांनी भोंगळे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याची माहिती दिली. नियमानुसार २०२२ पर्यंत सरकारी थकबाकी किती आहे याची माहिती भोंगळे यांना द्यायची होती. पण ती दिली नाही. २००१ ते २००५ मध्ये भोंगळे घुग्घुस ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यावेळी शासकीय लेखापरीक्षण केले असता भोंगळे यांच्याकडे सन २००१ – २००२ मध्ये ४ लाख ६२ हजार ५९३ रुपये, २००२ – २००३ मध्ये ४ लाख ७७ हजार ५० रुपये, २००३ – २००४ साली ४ लाख ७८ हजार ८३२ रुपये, वर्ष २००४ – २००५ मध्ये ६ लाख ८६ हजार ४९१ रूपए भोंगळे यांचेकडे शेष आहे. ही रक्कम भोंगळे यांचेकडून वसूल करण्याचे आदेश शासकिय आडिट मध्ये नोंदविले आहे. परंतु सादर केलेल्या चार उमेदवारी अर्जांमध्ये याबाबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा खुलासा झालेला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी सूरज ठाकरे आणि उमेदवार भूषण फुसे यांनी केली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालय मध्ये केस दाखल केल्याची माहीती दिली.
पत्रकार परिषदेत डॉ दिलीप चौधरी, भूषण फुसे, सुरज ठाकरे, रामदास चौधरी, गोमती पाचभाई उपस्थित होते.