चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मेगा भरती ला आरक्षणाची एलर्जी: भरती रद्द करा
Shreyash Wankhede:
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर ची मेगा भरती जाहिरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर निघाली आणि अर्ज स्विकारण्याची मुदतवाढ व ती संपली. तशीच भंडारा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भंडारा ची देखील जाहिरात आली. परंतु दोन्ही जाहिरात मधिल परिणाम कारक फरक आहे. असे वाटते की, भंडारा आणि चंद्रपूर एकाच राज्यातील जिल्हे नाहीत.भंडारा सहकारी बँकेत कॅटॅगरीज प्रमाणे आरक्षणाचे भरण्यासाठी जाहीरात मध्ये दिसते तर चंद्रपूर सहकारी बँक च्या जाहिरात मध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मागमूस ही नाही. या संदर्भात चंद्रपूर सहकारी बँक चे अध्यक्ष मा. संतोषसिंह रावत यांचे स्टेटमेंट आहे की सरकारी नियमानुसार जाहिरात व जागा भरणार आहेत.
मग त्यांनी 2021 चा संदर्भ दिला त्याप्रमाणे केवळ सुचना होती कायदा नव्हता. तरी चंद्रपूर सहकारी बँक आणि राज्य सरकार चे धोरण सहकारी बँक मेगा भरती संदर्भात जाहीर करण्यात यावे. मागास वर्गातील युवकांच्या आरक्षणा शिवाय मेघा भरती होत असेल तर सरकार ने नोकऱ्यांमधिल आरक्षण बंद केले काय? हा आमचा सवाल आहे. आमची विनंती आहे की चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मेगा भरती रद्द करण्यात यावी व निवडणूक झाल्यानंतर OBC/SC/ST/VJ/NT/Min etc. सह जाहिरात काढण्यात यावी. अन्यथा मूलनिवासी विद्यार्थी संघ, मूलनिवासी संघ, आणि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया -डेमाॅक्रेटीक च्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना मा. प्रिया कवडे मैम तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर ला देण्यात आले. माजी मानद सचिव जि. के. उपरे सर यांच्या नेतृत्वाखाली,पीपल्स पार्टी ऑफ इंडिया -डेमाॅक्राटीक चे राष्ट्रीय विभागीय सचिव एच.सी.सहारे सर, मूलनिवासी संघाचे एम.टी.साव सर,आणि 72-बल्लारपूर PPI-D चे उमेदवार उमेश शेंडे सर यांनी निवेदन दिले.