Sunday, December 7, 2025
HomeElectionराजुरा विधानसभा मतदार संघात वादग्रस्त १४ गावांतही ' निवडणुकीचा ज्वर '
spot_img

राजुरा विधानसभा मतदार संघात वादग्रस्त १४ गावांतही ‘ निवडणुकीचा ज्वर ‘

राजुरा विधानसभा मतदार संघात वादग्रस्त १४ गावांतही ‘ निवडणुकीचा ज्वर ‘

५ हजार २९३ मतदार दोन्ही राज्यांच्या यादीत

Shreyash Wankhede: 
राजुरा विधानसभा मतदारसंघातील जिवती तालुक्याच्या तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावांच्या सीमावादाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. या गावांतील ५ हजार २९३ मतदार दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत आहेत. तेलंगणा राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे आता महाराष्ट्र विधानसभा लढविणाऱ्या इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या. त्यामुळे या गावांतही सध्या निवडणुकीचा ज्वर दिसून येत आहे.
         मागील वर्षी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर रणकंदन सुरू होते. तेव्हा सत्ताधारी व विरोधकांनी रान उठवून मराठी अस्मितेसाठी प्रयत्नही केले होते. मात्र, जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमावादात होरपळणाऱ्या १४ गावांतील मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न २६ वर्षांपासून दुर्लक्ष राहिला आहे. १७ जुलै १९९७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्राची असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला; पण महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तेलंगणा सरकार आजघडीला या गावांवर आपला हक्क गाजवत प्रशासकीय व राजकीय हस्तक्षेप सुरूच
ठेवला आहे. मागील तीन दशकांपासून दोन राज्यांच्या कचाट्यात सापडलेल्या १४ गावांत सर्व मराठी भाषिक आहेत. तेलंगणातून बाहेर काढण्यासाठी का वेळ भेटत नाही, असा प्रश्न आता मतदारांनी उपस्थित केला आहे.
         तेलंगणा सीमेवरील १४ गावे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात आणि तेलंगणा राज्यातील आसिफाबाद विधानसभा क्षेत्रात येतात. तेथील नागरिकांचा महाराष्ट्र व तेलंगणा दोन्ही राज्यांच्या सरकारच्या मतदार यादीत समावेश असून, एकूण मतदार संख्या ५ हजार २९३ इतकी मतदारसंघाचे अधिकृत मतदार आहेत. दोन्ही राज्यांच्या प्रत्येक निवडणुकीत आहे. १९८९ पासून १४ गावांतील नागरिक पूर्वीच्या आंध्र प्रदेश व आताच्या तेलंगणा राज्याच्या अधिकृतपणे मतदान करणारे हे महाराष्ट्रातीलच नसून देशातील एकमेव उदाहरण आहे. मात्र, आणखी किती दिवस दोन्ही राज्यांचे मतदान करावे,असा प्रश्न आता येथील नागरिकांना पडला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page