Saturday, August 8, 2026
spot_img
HomePunyatithiमहात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व इतिहास विभागातर्फे महात्मा फुले पुण्यतिथी...

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व इतिहास विभागातर्फे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक व इतिहास विभागातर्फे  महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

श्रेयश वानखेडे:

बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रकाश मेश्राम यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. बादलशाह चव्हाण सर म्हणालेत की, ” महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने 19 व्या शतकातील शिक्षणतज्ञ होते. ज्यांनी स्त्री शिक्षणाची महुर्तमेढ रोवण्याचे कार्य करतांना सावित्रीबाई ना शिक्षण देऊन पुण्यात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली या सोबतच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व पटवून दिले ” या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ. किशोर चौरे इतिहास विभागप्रमुख  यांनी केले, प्रस्ताविकेत त्यांनी महात्मा फुले यांनी लिखित ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड, ब्राम्हनांचे कसब,यांची माहिती देत समाज कार्य कसे केले, तसेच इंग्रजांनी भारतात शिक्षणावर झिरप सिद्धान्त मांडला होता की शिक्षण जर उच्चवर्णीय लोकांना दिले तर ते समाजात खालच्या वर्गात पोहचेल परंतु भारतात तसे झाले नाही म्हणून या झिरप सिद्धांताला महात्मा फुले यांनी कसा विरोध केला हे आपल्या प्रस्तावित भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यानंतर महाविद्यालयाचे अधीक्षक प्रकाश मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले, तर आभार प्रदर्शन प्रा दिवाकर मोहितकर यांनी केले. या कार्यक्रमाला  महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page