Sunday, December 7, 2025
Homeबल्लारपूरनगरपरिषद शाळांच्या शिक्षण व्यवस्था सुधारेपर्यंत आम्ही सोडणार नाही. -आम आदमी पार्टी,...
spot_img

नगरपरिषद शाळांच्या शिक्षण व्यवस्था सुधारेपर्यंत आम्ही सोडणार नाही. -आम आदमी पार्टी, बल्लारपूर

नगरपरिषद शाळांच्या शिक्षण व्यवस्था सुधारेपर्यंत आम्ही सोडणार नाही.  -आम आदमी पार्टी, बल्लारपूर

“पर्याप्त शिक्षक नाही, शिक्षणाचा दर्जा नाही मग पटसंख्या वाढणार कशी?” स्थानिक आमदार तसेच मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष का?
श्रेयश वानखेडे:

सोमवार दि: 9/12/2024 रोजी, नगरपरिषद शाळांमधील शिक्षकांची संख्या वाढावी, शैक्षणिक दर्जेत सुधार व्हावा, सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना शाळेतून मिळावे, या मागण्यांना घेऊन गत काही वर्षांपासून आम आदमी पक्ष नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर दबाव तयार करित आहे. आता या प्रश्नावर पक्षाने थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे. सात वेळा निवडून आलेले स्थानिक आमदार स्वतःच्या मोठ मोठ्या विकास कामांबाबत ओळखले जातात. मग गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत व नगरपरिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जेबाबत आमदारांना चिंता का नाही? शिक्षक संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्न का करित नाही? असा सवाल उपस्थित करित शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने पुन्हा मुख्याधिकारी विशाल वाघ यांची भेट घेऊन शाळांमधील स्थितीबाबत पुन्हा शाळांचे निरिक्षण दौरा करण्याची पूर्व सूचना देण्यात आली. कारण पक्षाला पालकांकडून वारंवार शाळांच्या शिक्षण स्थितीबाबत तक्रारी मिळत आहेत. यावेळेस पक्षाने आमदार आणि मुख्याधिकारी जाणून बुजून शाळांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करित असल्याचे आरोप देखील केले. शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी माहिती दिली की, मुख्याधिकारी शाळांचे निरिक्षण दौरा करू देत नाही आहे.  यावेळेस शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, प्रवक्ता आसिफ शेख, महीला अध्यक्षा किरण खन्ना, महीला उपाध्यक्षा मनीषा अकोले, सलमा सिद्दिकी, रेणुका गायकवाड, गणेश अकोले, सम्यक व इत्यादी उपस्थित होते.


Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page