Tuesday, September 15, 2026
spot_img
HomeParbhaniडॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांचा पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठा कडून नागरी...

डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांचा पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठा कडून नागरी सत्कार सोहळा संपन्न.

डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांचा पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठा कडून नागरी सत्कार सोहळा संपन्न.

श्रेयश वानखेडे: 

सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील ह. मु. सेलू येथील रहिवासी डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची  भारत सरकारच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेब दानवे यांच्या शिफारस पत्राचा आणि डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून रेल्वे मंत्रालय अश्विनी वैष्णव यांच्या विशेष अभिरुची अंतर्गत परभणी जिल्ह्यातील डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची (झेडआरयूसीसी) रेल्वे बोर्ड सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सर्वोप्रथम पंडित दीन दयाल हिंदी विद्यापीठ यांनी श्री. प्रभु रामचंद्र यांच्या जन्मभूमी अयोध्या धाम येथे हॉटेल रेडिसन पार्क इन मध्ये मा. पद्मश्री डॉ. अरविंद कुमारजी कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ झांसी, डॉ. इंदू भूषण मिश्राजी कुलगुरू पंडीत दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा वृंदावन, सुप्रसिद्ध भागवत कथा वाचक मा. सुश्री दीपा मिश्राजी आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते  भव्य दिव्य असा नागरी सत्कार करून पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या व योग्य असे मार्गदर्शन केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,मी एका सामान्य कुटुंबात जन्मलो असून निपाणी टाकळी सारख्या छोट्या खेडे गावातून कसल्याही सूख सोयी सुविधा उपलब्ध नसताना पाच सहा किलो मीटर पायी चालत अनवाणी शिक्षण पूर्ण केले. पुढे आयुष्यात अनेक संकटांना मात करत शून्यातून परिश्रम करून स्वतः चे अस्तित्व निर्माण केले. कठोर परिश्रम करून त्यांनी स्वतःच्या  कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करून आज भारत देशातील केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या विशेष अभिरुची ने उच्चत्तम अश्या रेल्वे बोर्ड झेडआरयूसीसी चे सदस्य या पदावर नियुक्ती केली याचा मला सार्थ अभिमान असून आज माझा हा नागरी सत्कार नसून हा माझ्या जन्मभूमी निपाणी टाकळी माझी कर्मभूमी असलेल्या सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा, सेलू तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचा सन्मान आहे. या निवडीमूळे परभणी जिल्हा नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या नाव लौकिकात भर पडली असून  एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या पदावर जाऊ शकतो याचा आम्हाला निश्चित आनंद झाला आहे. याकामी मला माजी रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेब दानवे साहेब, त्यांचे स्वकीय महेश वैजनाथराव आकात, मुकेश हरिभाऊकाका बोराडे त्याच बरोबर माझे मित्र सोनवटीचे सरपंच मधुकर नाना सोळंके, शाम गजमल व अनेकांचे सहकार्य लाभले. त्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठातील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page