वन्य प्राणी व वनस्पती नष्ट होण्यापासून वाचवण्याकरिता धरणे आंदोलन:-राजेश वारलुजी बेले
नागपूर विधान भवना समोर धरणे आंदोलन

श्रेयश वानखेडे:
सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्प द्वारे घातक वायू, ध्वनी व जल प्रदूषण होत असल्यामुळे वन्य प्राणी व वन्य वनस्पती नष्ट होत असल्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी अन्यथा दि: २३ डिसेम्बर २०२४ सोमवार रोजी वेळ सकाळी 10 वाजता पासून नागपूर विधानभवना समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेली लाल मातीचे कण व लोह दगडातील शुष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज खाण मध्ये होत असलेल्या बॉम्ब ब्लास्टिंग मुळे व लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडत असल्यामुळे तेथील वन्य प्राणी व वनस्पती नष्ट होत आहे. मानवी जीव, जल प्राणी, वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण नवजात शिशु चा मृत्यू, दमा, हृदय विकार, त्वचा रोग, डोळ्याचे विकार, मेंदूचे विकार, क्षयरोग, कर्करोग अशा अनेक आजाराची सुद्धा लागण झालेली आहे.
१) लोह खनिज उत्खनन करते वेळी बॉम्ब ब्लास्टिंग मुळे हवेमध्ये शुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
२) लोह खनिज हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
३) लोह खनिज खाणीतून निघणार्या लोह खनिज मधून निघणारा ओवर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
४) लोह खनिज व खाणीतून निघणारे ओवर बर्डन ट्रक व हायवा गाडीमध्ये हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
५) जड वाहतुकीद्वारा कायद्याचे उल्लंघन करून वाहतूकीमूळे सुरजागड लोह खनीज प्रकल्पापासून एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोम्भूर्णा, केळझर, कोठारी बामणी या गावातील रस्ते व आजूबाजूचा परीसर लोह खनिजाचे हवेमध्ये उडते शुष्म कनामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
६) लोह खनिज खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्या द्वारे जंगलातून नदीमध्ये सोडत असल्यामुळे घातक जल प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
७) सुरजागड लोह खनिज प्रकल्प केळझर व राजुरा रेल्वे सायडिंग वर लोह खनिज हाताळणी करते वेळी हवेमध्ये शुष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे तिथे कुठलेही पर्यावरण कायद्या अंतर्गत उपाय योजना होत नाही.
सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनजी लि. तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली या प्रकल्पद्वारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र दि:- २३ डिसेम्बर २०२४ सोमवार रोजी वेळ सकाळी 10 वाजता पासून नागपूर विधानभवना समोर धरणे आंदोलन करणात येणार आहे. असा इशारा प्रेस नोट द्वारे राजेश वारलुजी बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी दिला आहे.
|
|









