Tuesday, August 25, 2026
spot_img
HomeChandrapurमध्यवर्ती बँक चंद्रपूरचे; मग परिक्षाकेंद्र इतके दूर का?- रोहित जंगमवार

मध्यवर्ती बँक चंद्रपूरचे; मग परिक्षाकेंद्र इतके दूर का?- रोहित जंगमवार

मध्यवर्ती बँक चंद्रपूरचे; मग परिक्षाकेंद्र इतके दूर का?- रोहित जंगमवार

श्रेयश वानखेडे:
ऑक्टोबर महिन्यात चंद्रपुर मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपीक व शिपाई पदांसाठी पदभरती निघाली होती. ही पदभरती सुरूवातीपासूनच विविध कारणांमुळे विवादात असतांना आता दूरवरच्या परिक्षा केंद्रामुळे पुन्हा पदभरती चर्चेत आली आहे. 21, 22 व 23 डिसेंबर रोजी परिक्षा होणार आहे व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्र नाशिक, पुणे, औरंगाबाद सारख्या दूरवरच्या ठिकाणी देण्यात आले आहे. यावर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक रोहित जंगमवार यांनी  परिक्षा केंद्र इतक्या दूरवर च्या ठिकाणी देऊन उमेदवारांना परिक्षेपासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे असा आरोप केला. तसेच जंगमवार यांच्या नेतृत्वात काही उमेदवारांनी चंद्रपुर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात निवेदन सादर करून परिक्षा केंद्र बदलून जिल्ह्यातच देण्याची मागणी केली.
यानंतर स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या कार्यालयात जाऊन दोन्ही आमदारांनी देखील या विषयास गांभीर्याने घेऊन परिक्षा केंद्र बदलून मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची निवेदनामार्फत विनंती केली. यावेळेस विनित राजगडकर, अंकुश जंपलवार, अतुल मडावी, शेषराव राठोड, संदिप दहिकर, प्रणय जांभुळकर, रितीक केळझरकर, व इतर स्पर्धा परिक्षा विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page