Sunday, August 23, 2026
spot_img
HomeChandrapurज्येष्ठ नागरिकांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरावा - आ. किशोर जोरगेवार ; ...

ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरावा – आ. किशोर जोरगेवार ; परिवर्तन ज्येष्ठ मंडळाच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रतिपादन

ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरावा – आ. किशोर जोरगेवार

परिवर्तन ज्येष्ठ मंडळाच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रतिपादन

*Jyotsna Wankhede*: ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असून, त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या आवश्यक सुविधांसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  परिवर्तन ज्येष्ठ नागरिक संघाला दोन वर्ष पूर्ण झाल्या बदल बाबूपेठ येथे  आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांची तसेच अडचणींची आस्थेने विचारपूस केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष प्रदिप किरमे, दिवाकर पूडट्टवार, नगर सेविका लता साव, मुकेश गाडगे, बावणे, शंकर कोल्हे, भोयर आदिंची उपस्थिती होती.

           यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात अनेक अनुभव घेतले असून, त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासोबतच त्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

             शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विविध ज्येष्ठ नागरिक संघांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुढील काळातही आवश्यक सहकार्य केले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा, संवाद आणि सामाजिक उपक्रमांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

            बाबूपेठ परिसराच्या विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  कार्यक्रमाला परिवर्तन ज्येष्ठ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्नांवर आमदार जोरगेवार यांच्याशी संवाद साधला.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page