Saturday, December 6, 2025
Homeबल्लारपूरप्रादेशिक युवा पत्रकार संघाने केला सेवाव्रतांचा सत्कार
spot_img

प्रादेशिक युवा पत्रकार संघाने केला सेवाव्रतांचा सत्कार

प्रादेशिक युवा पत्रकार संघाने केला सेवाव्रतांचा सत्कार

बल्लारपूर येथे पार पडला हृदयस्पर्शी समारंभ 

गणमान्य पत्रकारांनी दर्शवली उपस्थिती

श्रेयश वानखेडे:
शासन आणि समाज आजही गरजूपासून कोसो दूर आहे. मात्र, याला अपवाद सामाजिक क्षेत्रात कार्यरत काही व्यक्ती आहे. समाजसेवा करताना ते अनभिज्ञ आहेत. प्रसिद्धीसाठी ते कार्य करत नाही. नारायणाचे व्रत म्हणून ते कार्यप्रवण होत आहे. अनाथ व गरिबांची सेवा, ते ईश्वरी कार्य म्हणून करत आहे. ते म्हणजे सेवाव्रत जोपासणारे पांडुरंग जरीले आणि कल्पना कोकस हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आहे. या सेवाव्रतिचा हृदयस्पर्शी सत्कार समारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात सोमवारी पार पडला. बल्लारपूर येथील प्रादेशिक युवा पत्रकार संघाने सेवावृत्तीचा गौरव केला.
यावेळी शहरातील व तालुक्यातील गणमान्य पत्रकारांची उपस्थिती होती. औचित्य होते, पत्रकार दिनाचे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी केली. यावेळी सामाजिक कार्य करणारे व समाजाला प्रेरणादायी पांडुरंग जरीले आणि कल्पना कोकस यांचा भावपूर्ण सत्कार प्रादेशिक युवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक युवा पत्रकार संघाचे मार्गदर्शक अनेकश्वर मेश्राम होते. तर सत्कारमूर्ती प्रा. पांडुरंग जरीले, कल्पना कोकस, प्रादेशिक युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेंद्र आर्य यांची उपस्थिती होती.
यावेळी सत्कारमूर्ती प्रा. पांडुरंग जरीले म्हणाले, पत्रकारांच्या लेखनीत मोठी ताकत आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या बातमी मुळे प्रशासनाला दखल घ्यावी लागते. समस्या सोडविण्यासाठी मदत होते.आपले कार्य हे समाजातील वंचित घटकासाठी आहे. हे कार्य शेवट पर्यंत करण्याचा मनोदय,त्यांनी सत्कारादाखल व्यक्त केला. सेवानिवृत्त पारिचारीका कल्पना कोकस यांनी देखील आपल्या सामाजिक कार्याचा उलघडा केला.
अनेकश्वर मेश्राम यांनी अध्यक्षस्थानावरून पत्रकारांनी सामाजिक जाणिवेतून सामाजिक कार्याला न्याय द्यावा, असे सांगितले.
संचालन प्रादेशिक युवा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष घनश्याम बुरडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रशांत भोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव सुभाष भटवलकर, सह सचिव विवेक गडकर,आषिश खाडे, प्रमोद येरावार, वैभव मेश्राम यांच्यासह शहरातील पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page