Sunday, December 7, 2025
HomeJayantiजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर. के. वानखेडे ज्येष्ठ शिक्षक, प्रमुख पाहुणे  आर. बी. अलाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी अवनी पेटकर, निखिल कन्नोजवार, अनुष्का दुर्गे, वैशाली महानंद, गायत्री टेकाम, त्रिशाली महानंद, रूपाली निमकर, कोमल उईके यांनी  कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जीवनपटावर आपल्या भाषणातून माहिती दिली.
प्रास्ताविक माहिती देतांना  आर. बी. अलाम सर यांनी सांगितले की,  कर्मवीरांना पैशाचा मोह नव्हता, त्यांच्या काळात दवाखाने,  आयुध निर्माणी  निर्माण झाले. त्यांच्यावर आधी  लोकमान्य टिळकांचा  नंतर महात्मा गांधी यांचा प्रभाव पडला. त्यांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले. अध्यक्षीय भाषण करताना आर. के. वानखेडे यांनी ” ज्योत से ज्योत जगाते चलो..” हे गीत गायन केले.
 कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आर. बी. अलाम, संचालन एस. एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page