*प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची आमसभा; ९% लाभांश वितरित, सेवानिवृत्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर तालुका प्रा. शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे माजी अध्यक्ष सय्यद मुजीब यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटी लॉन येथे रविवारी पार पडली.
यावेळी मंचावर उदघाटक म्हणून उमा सदाशिव तेलंग, संस्थेचे अध्यक्ष सदन मुनगेलवार, सतीश बावणे, सदानंद उमरे, प्रभाकर काकडे, पुष्पलता दरेकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक तथा संस्थेचे माजी अध्यक्ष जे. डी. पोटे यांचेसह अल्का चौधरी, दुर्गा खरपकर, देवराव कोडापे, दामोधर किंगरे, गीता हजारे, भाऊराव झाडे, टिकोजबुद्धदास वाळके, चित्रा भोंयर, कल्पना आंबोरकर, संजय डोळस, ललिता उपरकर, शीला चहारे आदी शिक्षकांचा आणि पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष सदन मुनगेलवर यांनी प्रास्ताविकात संस्थेला झालेल्या नफ्याची माहिती देत सभासदांना नऊ टक्के लाभांश दिल्याचे सांगितले. पुढे त्यांनी सभासदांचे हित लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगत संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.
यावेळी मान्यवरांनी पतसंस्थेच्या निर्मितीसाठी सदाशिव तेलंग, जे. डी. पोटे, सय्यद मुजीब, सदानंद उमरे, देशमुख, आसेकर आदींचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. संचलन पुष्पा आळे यांनी तर आभार प्रवीण नवले यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सचिव अनिल आवळे, संचालक रविंद्र वाककर, प्रमोद उरकुडे, गजानन मरापे, शांताराम कुमरे, पुरुषोत्तम तायडे, श्रद्धा भुसारी(विघ्नेश्वर), राजेश राणे आदींनी परिश्रम घेतले.