Sunday, December 7, 2025
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 52 वे...
spot_img

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे बक्षीस वितरण व समारोप

मोहसीनभाई जव्हेरी  कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे बक्षीस वितरण व समारोप

श्रेयश वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय बल्लारपूर येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष मान. श्री. इब्राहिम जव्हेरी  उपसचिव बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर तसेच बक्षीस वितरक म्हणून मान. श्री. राजकुमार हिवारे  प्राचार्य प्रशिक्षण संस्था चंद्रपूर त्याचबरोबर मंचावर उपस्थित शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम व मा. श्री. रवींद्र लामगे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर व सन्मित्र स्कूल बल्लारपूर च्या प्राचार्य सौ. अरुंधती कावडकर मॅडम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. इब्राहिम जव्हेरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे विज्ञानाचा महत्व पटवून दिले अधिक प्रोत्साहन देणाचे सर्व शाळांना आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन मा. सबतकौर भौड मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा तसेच शिक्षकांसाठी ‘ घर घर संविधान ‘ या विषयावर परिसंवाद स्पर्धा ठेवण्यात आली होती. प्रदर्शनी मध्ये प्रथम बक्षीस 1001, द्वितीय बक्षीस 701व तृतीय बक्षीस 501 आणि  सर्व सहभागी 70 शाळांना प्रत्येकी 500 रुपये  प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून मान. जैनुद्दीन जव्हेरी  यांच्याकडून  देण्यात आलेले आहे. श्री. लामगे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांनी तालुकास्तरीय प्रदर्शनी करिता साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचायत समितीकडून या शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन सौ. सुनीता मॅम यांनी व्यक्त केले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page