स्वयंशिस्तीतून व्यक्तिमत्त्व घडवावे- डॉ. सुनील जाधव.
सेलूच्या नूतन विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात.
श्रेयश वानखेडे:
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षकांना प्रश्न विचारात राहिले पाहिजे. वेळेचा सदुपयोग करावा, भारतीय संस्कृतीचे जतन करावे आणि गुणवत्तेसोबत स्वयंशिस्त अंगी बाणवून व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा वस्तू व सेवा कर राज्यकर उपायुक्त डॉ.सुनील जाधव यांनी केले.
‘नवी दिशा नवी आशा’ या संकल्पनेवर सेलू येथील नूतन विद्यालया चे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी २३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया होते. उपाध्यक्ष डी. के. देशपांडे गुरूजी, शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंत्री, मकरंद दिग्रसकर, दत्तराव पावडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, प्रा. संजय पिंपळगावकर, वाल्मिकी खुळे यांची उपस्थिती होती. या वेळी वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील ६६२ विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे यांनी अहवाल वाचन केले.पाहुण्यांचा परिचय सिध्दी रोडगे हीने दिला. सूत्र संचालन स्वरा लाठकर, मित पुरणाळे यांनी केले. सच्चिदानंद डाखोरे आणि विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रमाणपत्र वितरणाचे सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ. सुरेश हिवाळे, शिल्पा बरडे, गणेश माळवे, संजय भुमकर यांनी केले. रोहिदास मोगल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मंजुषा जाधव, डॉ. गंगाधर गळगे, नारायण इक्कर, शुभदा सुभेदार, माधवी पिंगळे, आदींसह पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सदस्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.