Friday, October 23, 2026
spot_img
HomePolice*अवैध अमली पदार्थ तस्करीविरोधात LCB ची धडक कारवाई - एम.डी. ड्रग्जसह आरोपी...

*अवैध अमली पदार्थ तस्करीविरोधात LCB ची धडक कारवाई – एम.डी. ड्रग्जसह आरोपी गजाआड*

*अवैध अमली पदार्थ तस्करीविरोधात LCB ची धडक कारवाई – एम.डी. ड्रग्जसह आरोपी गजाआड*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
युवा पिढीला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखा (LCB) च्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की, रामाळा तलाव परिसरातील एक इसम एम.डी. ड्रग्ज विकण्यासाठी जमनजेट्टी परिसरात येणार आहे.
*दिनांक २१ ऑक्टोबर २०२६* रोजी पथकाने *हनुमान मंदिरासमोर, M.S.E.B. ऑफिस जवळ, जमनजेट्टी परिसर, चंद्रपूर शहर* येथे सापळा रचला.
वर्णनानुसार पांढऱ्या रंगाचा तपकिरी ठिपके असलेला फुल बाह्यांचा शर्ट आणि काळी फुल पॅन्ट घातलेला संशयित येताच पथकाने त्याला चारही बाजूंनी घेराव घालून ताब्यात घेतले.
*आरोपीचे नाव:*
*शानवाज उर्फ शानू इस्माईल शेख, वय २८ वर्षे, रा. अहेमदीया मस्जिद जवळ, रामाळा तलाव, चंद्रपूर*
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एका प्लास्टिक पुडीत पांढऱ्या रंगाची *एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग पावडर*, मोबाईल फोन आणि रोख रक्कम आढळली. टेस्टिंग किटद्वारे तपासणी केली असता ते अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
*जप्त मुद्देमाल:*
– एम.डी. ड्रग पावडर ६.७३० ग्रॅम – रु. २०,१९०/-
– OPPO A-5 PRO कंपनीचा मोबाईल – रु. २०,०००/-
– रोख रक्कम – रु. २,१२०/-
*एकूण मुद्देमाल – रु. ४२,३१०/-*
*तपासात काय समोर आले?*
प्राथमिक तपासात आरोपीने हा ड्रग पावडर *नागपूर येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली* दिली आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे *अंमली पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब)* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
*कारवाई कोणी केली?*
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, सुनिल गौरकार आणि अंमलदार सतीश अवथरे, लालू यादव, इम्रान खान, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार (सर्व LCB) आणि सायबर पोलीस स्टेशनचे मुजावर अली यांनी ही कारवाई केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page