धर्नुविद्येसाठी आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आलेल्या १० कोटी रूपये खर्चाच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता द्यावी
आ सुधीर मुनगंटीवार यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी
Shreyash Wankhede:
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी धर्नुविद्येसाठी आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आलेल्या १० कोटी रूपये खर्चाच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोक उईके यांच्याकडे केली आहे.
या मागणी संदर्भात शासनाला सादर केलेल्या निवेदनात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील प्रमुख आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे तरूण सात्विक, प्रामाणिक, परिश्रमी व काटक आहे. याचा अनुभव आपण सन २०१४ ते २०१९ या कालावधीत राबविलेल्या मिशन शौर्य या उपक्रमादरम्यान घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी माऊंट एव्हरेस्ट सारखे सर्वोच्च शिखर गाठून आपले शौर्य व साहस सिध्द केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी तरुणांसाठी धर्नुविद्या या क्रिडाप्रकाराकरिता आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आलेल्या १० कोटी रूपये खर्चाच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक उईके यांच्याकडे केली आहे.
वरील मागणी करणा-या निवेदनात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्याची क्रिडा विषयक प्रगती व्हावी यादृष्टीने क्रिडा क्षेत्रात आपण मोठया प्रमाणावर भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. तीन स्मार्ट सिंथेटीक ट्रॅक असलेल्या चंद्रपूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. या जिल्ह्यात अत्याधुनिक अशा अनेक स्टेडियमची निर्मीती आपण केली आहे. बालेवाडीनंतर अत्याधुनिक स्वरूपाचे असे बॅडमिंटन कोर्ट चंद्रपूर जिल्ह्यात उपलब्ध आहेत. आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले सन १८५८ च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांशी निकराने झुंज देत शहीद झालेले क्रांतीवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या नावाने म्हाडामध्ये १६ एकर जागा आपण उपलब्ध केलेली आहे. १३७ कोटींचे वातानुकुलीत स्टेडियम बांधकाम प्रस्तावित आहेत. मिशन ऑलिम्पीक या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. धर्नुविद्या या क्रिडाप्रकारासाठी अंदाजे १० कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव क्रीडा विभागाने आदिवासी विकास विभागाकडे सादर केलेला आहे. जिल्ह्यात विसापूर येथे अत्याधुनिक सोयीनी परिपूर्ण असे तालुका क्रीडा संकुल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेम्स देखील संपन्न झाले आहे. याच ठिकाणी हा प्रस्ताव कार्यान्वित होण्याचे प्रस्तावित आहे.धर्नुविद्या या क्रिडा प्रकाराच्या माध्यमातुन आदिवासी तरूण-तरूणींचे कौशल्य जागतिक पातळीवर अधोरेखित व्हावे व त्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्हयाची मान अभिमानाने उंच व्हावी यासाठी या प्रस्तावाला आपण तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. या मागणीसाठी आ. मुनगंटीवार यांनी राज्यपाल, क्रीडामंत्री, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांना देखील निवेदने सादर केली आहे.