Monday, April 20, 2026
HomeParbhaniराज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात.
spot_img

राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात.

राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात.

श्रेयश वानखेडे:

मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा तसेच आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून  सेलू तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत.  या बाबत माहिती अशी की, मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा तसेच राज्यातील 256 तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्य गृह होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सेलू तालुका पत्रकार संघाने केली आहे.  मराठी पत्रकार परिषदेचे सर चिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांनी सेलू येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाची माहिती देणारा प्रदर्शन ही या मेळाव्यात लावण्यात येणार आहे. त्या संदर्भात जिल्हा धिकारी कार्यातील माहिती अधिकारी सुनील पोटेकर हेही यावेळी उपस्थित होते. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इल्यास, कांचन कोरडे मोहसीन अहमद,  संजय मुंडे, शिवाजी शिंदे,नीरज लोया, सतीश आकात आदी पदाधिकाऱ्यांना यावेळी विविध सूचना  देण्यात आल्या. निवासव्यवस्था,भोजन व्यवस्था, नाट्यगृहातील व्यवस्था याबाबत  विविध माहिती आणि   विविध सूचनाकरण्यात आल्या. या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष  विनोद बोराडे हे आहेत. कार्यक्रमाला सामा जिक न्यायमंत्री  ना. संजय शिरसाठ, पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम  देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शना खाली  मेळाव्याची  तयारी करण्यात येत असून आज परिषदे च्या वतीने अंतिम तयारी पुन्हा एकदा हात फिरवण्यात आला. सेलू तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page