Monday, April 20, 2026
HomeChandrapurजिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता ,वरीष्ठ सहायक , परीचर अडकले लाचलुचपत प्रतिबंधक...
spot_img

जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता ,वरीष्ठ सहायक , परीचर अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता ,वरीष्ठ सहायक , परीचर अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

श्रेयश वानखेडे: 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,वरिष्ठ सहायक, परिचर यांना एका ठेकेदार कडून ४ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई १० एप्रिल रोजी करण्यात आली.

हर्ष यशोराम बोहरे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परीषद, सुशील मारोती गुंडावार वरीष्ठ सहायक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परीषद, चंद्रपूर व मो. मतीन फारुख शेख, परीचर (कंत्राटी), ग्रामीण पाणी पुरवठा असे लाच घेणारे आरोपीचे नाव आहे.

          तक्रारदार जिवती येथील रहिवासी असून त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या “जल जीवन मिशन” कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी स्वतः करीता ४ लाख रुपयांची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता २० हजार  रूपयेची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकूण ४ लाख २० हजार रुपयाचे लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने हर्ष बोहरे व  सुशील गुंडावार, यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.

          प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०७/०४/२०२५, ०९/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४ लाख २० हजार रुपयाचे लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून १० एप्रिल रोजी सापळा कारवाई दरम्यान सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम ४ लाख २० हजार रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २० हजार रूपये स्वतः करीता वेगळे काढून उर्वरीत ४ लाख रूपये मतीन शेख यांना हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने मो. मतीन शेख यांनी सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून हर्ष बोहरे यांचे घरी नेऊन दिली. सदरची लाचरक्कम स्वीकारणारे हर्ष बोहरे व सुशील गुंडावार यांना ताब्यात घेण्यात आले तसेच  लाचरक्कम नेऊन देणारे मतीन शेख यांना ताब्यात घेण्यात आले असुन आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी पो.स्टे. रामनगर, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. नि. जितेंद्र गुरनूले, पो.हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो.अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page